सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
संबंधित पोलीस ठाण्यांकडून परवानगी घेणे आवश्यक
बीड । वार्ताहर
पावसाळा सुरु झाल्यामुळे घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे सदर कारणास्तव खुले लॉन,विना वातनुकूलित मंगल कार्यालय,हॉल, सभागृह,घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिग आणि कोविड 19 संदर्भात वेळावेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ परवानगी देण्यात येत आहे.सदरील परवानगी ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहे त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशन यांचेकडून संबंधिताने प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेे आहेत.
लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख यापूर्वीच्या आदेशामध्ये नसल्याने 50 लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत होते.कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टीसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्यासाठी पोलीस विभागास अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या प्राप्त सूचना व मागणी विचारत घेऊन तसेच पावसाळा सुरु झाल्या असल्यामुळे खुले लॉन,विना वातनुकूलित मंगल कार्यालय,हॉल,सभागृह,घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिग तसेच कोविड 19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास, नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याकडून परवानगी देण्यात येईल. फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये राहूल रेखावार , जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी हे आदेश दिले आहेत.
Leave a comment