बीड । वार्ताहर
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सोमवारी शासकीय विश्रामगृह बीड येथे कृषी विक्रेत्यांच्या अडचणीवर विस्तृत चर्चा झाली.सोयाबीन उगवणशक्ती बाबत कृषी मंत्री महोदयांना विक्रेत्यांना येणार्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली. विक्रेत्यांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी केली.
तसेच विक्रेते हे सीलबंद बियाणे आणून सीलबंद विक्री करतात त्यामुळे विक्रेत्यावर कुठलीही कारवाई होऊ नये याबाबतचा आग्रह संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी केला. तसेच युरिया खताचा बाबत उत्पादक कंपन्या युरिया एद पुरवठा करतात त्यामुळे युरियाच्या किमतीमध्ये वाढ होते व विक्रेता बदनाम होतो. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांना ऋजठ बेसिस वर युरिया पुरवठा करण्याबाबत आदेशित करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकरी हा केंद्रबिंदू असून शेतकर्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सर्वांनी सहकार्य केले पाहिजे असेही या बैठकीत सर्वानुमते चर्चा झाली. सोयाबीनच्या उगवणशक्ती बाबत कमी पर्जन्यमान मध्ये सोयाबीनची पेरणी झाल्यामुळे बर्याच ठिकाणी शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे हेसुद्धा कृषी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यांनी याबाबत आमचे तज्ञ अधिकारी पूर्ण चौकशी करून अंतिम निर्णय घेतील असे आश्वासन याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले आहे. याप्रसंगी बीड येथील मनमोहन कलंत्री सत्य नारायण कासट भीमराव काळे अंगद नवले गणेश भोज इत्यादी व्यापारी बंधू उपस्थित होते.
Leave a comment