केज-अंबाजोगाईत मनसेकडूनही कृषीमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकर्यांना कर्जमाफी व पीक कर्जासाठी आंदोलन पुकारले आहे त्याचाच भाग म्हणून परळी येथील भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरून सोमवारी बीड जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर एसबीआयसमोर निदर्शने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्र्यांना घेराव आंदोलन करत शेतकर्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र दिसून आले. दरम्यान केज आणि अंबाजोगाईन मनसेच्या पदाधिकार्यांनीही कृषी मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देत सोयाबीन बियाण्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
बीडमध्ये भाजपाचा कृषी मंत्र्यांना घेराव
शेतकर्यांचे कर्ज माफ करा, पीककर्ज तातडीने वाटप करा अशा घोषणा देत सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालय आवारात भाजपच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना घेराव घालण्यात आला.यावेळी दादासाहेब भुसे यांच्याशी शेतकर्यांच्या अडचणींबाबत चर्चा करून त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजयकुभार पालसिंगणकर, तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, भगीरथ बियाणी, चंद्रकांत फड, अॅड.सर्जेराव तांदळे, ड संगीता धसे, शिवाजीराव मुंडे, फारुक शेख, राजेंद्र बांगर, सुभाष धस, संजय नलावडे, बालाजी पवार, संध्या राजपूत, शीतल राजपूत, लता मस्के, अनिता जाधव, मीरा गांधले, संजीवनी राऊत,शांतिनाथ डोरले, विलास बामणे, संभाजी सुर्वे, अनुरथ सानप, लाला पन्हाळे,अमोल वडतिले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एसबीआयसमोर निदर्शने
वडवणी येथील भाजपच्या वतीनेस्टेट बँक ऑफ इंडिया समोर तीव्र निदर्शने केली. यावेळी माजी आ. केशवराव आंधळे, माजलगाव विधानसभाचे नेते रमेशराव आडसकर, नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेद्र मस्के, दिनकरराव आधंळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी डिसीसी संचालक बाबरी मुंडे, संजय आंधळे, तालुकाध्यक्ष पोपटराव शेडंगे पाटील, माजी अध्यक्ष राम पाटील सांवत, रामेश्वर जाधव, मचिंद्र झाटे, महादेव सावंत आदि भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
परळीतही निदर्शने
राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकर्यांना पीक कर्ज द्यावे व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी दुपारी बारा वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया राणी लक्ष्मीबाई टॉवर बँकेसमोर तीव्र निदर्शने करत तहसीलदारांनानिवेदन दिले. यावेळी यावेळी माजी आ. विजय गव्हाणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे,श्रीराम मुंडे, प्रा.विजय मुंडे, राजेश गिते, पवन मुंडे, भरत सोनवणे, भास्कर फड, उमेश खाडे, चंद्रकांत देवकते, संजय मुंडे,बिभिशन फड, रवि कांदे, बळीराम गडदे, माधवराव दहिफळे आदी सहभागी झाले होते.
केज तहसीलसमोर दोन तास धरणे
शेतकर्यांना पिककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे, महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकर्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करिता नुकसान भरपाई देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले यावेळी तालुका ध्यक्ष भगवान केदार,जि.प.सदस्य विजयकांतमुंडे, रमाकांतमुंडे, विष्णू घुले, संदीप पाटील, कैलास पाटील, शिवदास पाटील, शरद इंगळे, सुनील घोळवे, पंडित सावंत, बंडू शिंदे, अंगद मुळे, राहुल गदळे, कैलास जाधव, शेषराव कसबे, संतोष देशमुख, अतुल इंगळे, महादेव सुर्यवंशी, खदिर खुरेशी आदी उपस्थित होते.
आष्टीत माजी आ.धोंडे,आ.धस यांचे प्रशासनाला निवेदन
शेतकर्यांची कर्जमाफी झाली असली तरी अनेक शेतकरी कर्जमाफीपासुन वंचीत आहेत अशा वंचीत शेतकरी व ईतर शेतकर्यांना तात्काळ पिक कर्ज द्यावे अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. सोमवार दि.22 जुन रोजी सकाळी 11 वा. सोशल डिस्टन्स ठेवत आष्टीचे तहसिलदार वैभव महिंद्रकर यांना निवेदन दिले. यावेळी बबन झांबरे, अशोक साळवे, एन.टी.गर्जे, आण्णासाहेब लांबडे, जाकीर कुरेशी, बाबु कदम, शंकर देशमुख, महादेव कोंडे, देवीदास परकाळे उपस्थित होते.दरम्यान खरीप हंगामासाठी शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करणे व कर्ज माफी योजनेची अंमलबजावणी करणे यासह अन्य मागण्यांबाबत भाजपच्या वतीने आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोशल डिस्टंन्स पाळून तहसिलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन तहसिलदार वैभव महिंद्रकर यांना देण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी छञुघ्न मरकड,बद्रीनाथ जगताप, नगराध्यक्ष भारत मुरकुटे, रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, राजू शिंदे, माऊली जरांगे, आदी उपस्थित होते.
केज-अंबाजोगाईत मनसेचे कृषीमंत्र्यांना निवेदन
शेतकर्यांना सोयाबीनच्या दुबार पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपयांची मदत तात्काळ करावी, निकृष्ट बियाणे बाजारात आणल्या बद्दल बीज उत्पादन करणार्या कंपन्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन केज मनसेच्या वतीने केज तहसीलदारांमार्फत कृषीमंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुकाध्यक्ष कल्याण केदार,गोरख तोगे,गोविंद हाके,नितीन बोराडे,विक्की पोपळे,संतोष शिरसट, राजेभाऊ धायगुडे,मनसे विद्यार्थी सेनेचे गणेश काळे,सचिन शिंपले उपस्थित होते. अंबाजोगाई तालुक्यातील न उगवलेल्या सोयाबीन बियाणांची शेतकर्यांना नुकसान भरपाई देवून बियाणे उत्पादक कंपन्यावर कायदेशीर कार्यवाही करा असे निवेदन मनसेच्या वतीने कृषीमंत्री दादाजी भुसे यांचेकडे करण्यात आली निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप, तालुका सचिव लक्ष्मण शिंदे, शाखा अध्यक्ष सागर किर्दंत आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
Leave a comment