बीड । वार्ताहर
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये योग साधनेचे किती महत्त्व आहे हे पटवुन देण्याचा प्रयत्न रांगोळीतून संस्कारभारतीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी केला.
आंतरराष्ट्रीय योगदिन अर्थात 21 जून या दिवशी आपल्या निरोगी आयुष्यासाठी दररोज योग साधना करणे आणि आपली ऊर्जा शक्ती वाढवणे हे गरजेचे आहे. त्याकरिता योगसाधना करण्याचे अनेकजण आवाहन करत असतात परंतू संस्कारभारती बीडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी भूअलंकरणच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग यानिमित्ताने केला. आणि एक सुंदर कलाकृती साकारून योगसाधनेचे महत्त्व पटवुन दिले. अगदी प्रत्यक्षात योगकृती चालु आहे असा भास निर्माण होतो.
एकत्रित आंतर चिकित्सा प्रणालीचा उपचार करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे यांनी ज्योती विद्यापीठ वूमन युनिव्हर्सिटी जयपूर येथे दूरदृश्य संवाद प्रणालीने आयोजित केलेल्या समारंभात केले
जयपूर येथील ज्योती विद्यापीठ वूमन युनिव्हर्सिटीने होमिओपॅथी , फार्मसी,आयुर्वेद,फिजिओथेरपी व इंटिग्रेटिव्ह मेडिकल सायन्स या विद्याशाखा मिळून इंटेलेकटचुवल बास्केट आफ वूमन कॉन्फरन्सचे आयोजन केले होते त्यामध्ये डॉ भस्मे बोलत होते,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगाला होमिओपॅथीचे महत्व पटले असून सर्व चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी संयुक्तपणे एकत्रित आंतर चिकित्सा पद्धतीचा अवलंब करावा,रोग्याला वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे सांगताना पूर्व मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या आदेशान्वये बीड तालुक्यात पाच लाख लोकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक या औषधी वाटपाची माहिती देऊन याची उपयुक्तता पटवून दिल्याचे सांगितले तसेच देशात ज्या ठिकाणी आर्सेनिक या औषधाने दिसून आलेल्या उपयुक्ततेची माहितीही दिली, त्यामुळे चिकित्सकांनी आपला एकमेकाविषयीचा व पॅथी विषयीचा असलेला गैरसमज व द्वेष दूर करावा व एकत्रित आंतर चिकित्सा प्रणालीचा अप्रोच ठेवून अवलंब करावा व यासाठी सरकारनेही पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले,
या चर्चा सत्रात केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ अनिल खुराणा, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी अध्यक्ष तथा एच एम इ आयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रामजी सिंग, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे सेक्रेटरी डॉ कुमार विवेकानंद, राजस्थान होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ पंकज शर्मा, डॉ रेणू बन्सल होमिओपॅथी डायरेक्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
सुरवातीला युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू श्रीमती विदुषी गर्ग यांनी चर्चा सत्राचे दीप प्रजवलन करून उदघाटन केले व सर्वांचे स्वागत केले,युनिव्हर्सिटी चे संस्थापक संचालक डॉ पंकज गर्ग यांनी कांफरन्सच्या आयोजनाचा उद्धेश व विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल प्रस्तुत केला तसेच कॉरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू लोकांना साहाय्य केलेल्या कार्याची माहिती दिली , एनआयए मधील विभागप्रमुख डॉ.कमलेश शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने व्याख्यान दिले,
या कांफरन्सला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. पी. सिंग,श्रीमती साची शर्मा सेक्रेटरी ,प्रोफेसर डॉ एस सी शर्मा डायरेक्टर ,डॉ धर्मवीर यादव, डॉ. संजीव झा प्रेसिडेंट आएपी,डॉ अरुण चौगुले, डॉ.रेणू बन्सल ,डायरेक्टर होमिओपॅथी यांनी शुभेच्छा पाठविल्या त्याचे वाचन करण्यात आले,डॉ रेणू महिंद्रा रिसर्च एक्स्पर्ट,डॉ सुनीता तोमर भोपाल एकडेमिक एक्स्पर्ट, डॉ. वैभव अग्रवाल एकडेमिक एक्सपर्ट, डॉ. स्मिता मेहरा डेहराडून रिसर्च एक्स्पर्ट म्हणून काम पाहिले
डॉ. रामजी सिंग यांनी विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला डॉ अनिल खुराणा यांनी कोविद 19 या आजारावर परिषदेकडून करीत असलेल्या कार्याची माहिती दिली, डॉ. पंकज शर्मा यांनीही कोविद 19 च्या संदर्भात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व विद्यापीठाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, प्राचार्य डॉ. एम. पी. शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.
Leave a comment