बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून रविवारी तपासणीसाठी पाठवलेेल्या 31 पैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सोमवारी (दि.22) जिल्ह्यातून एकुण 67 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
आज जिल्ह्यातून एकुण 67 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत याचे अहवाल प्राप्त होवू शकतात. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 8, कोव्हीड केअर सेंटर बीडमधून 36, अंबाजोगाई कोव्हीड केअर सेंटरमधून 19 अंबाजोगाई स्वाराती महाविद्यालयातून 4 असे एकुण 67 आणि रविवारचे प्रलंबित 3 अशा स्वॅबचा समावेश आहे.
आज बीडमधून दोघांना मिळणार डिस्चार्ज
दरम्यान आज बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दोन रुग्ण कोरोनामुक्त होणार असून त्यांना सायंकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल असे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगीतले. सध्या 28 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत तर 80 जण बरे होवून घरी परतले आहेत.
Leave a comment