बँक अधिकार्यांकडे सुपूर्त करावा-जिल्हाधिकारी
बीड । वार्ताहर
शेतकर्यांनी पीक कर्जाचे अर्ज जमा करण्यासाठी व शेतकर्यांना पीक कर्जासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बँका वेळोवेळी याबाबत आपल्या मेळावे आयोजित करीत असून शेतकर्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करुन मेळाव्याची तारीख माहित करुन घ्यावी. ज्यादिवशी मेळावा असेल त्यादिवशी कोरोना विषयक सर्व नियम व सामाजिक अंतर याबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन विहीतनमुन्यात अर्ज संबंधित बँकचे अधिकारी यांचेकडे मेळाव्यातच सुपूर्त करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
पीक कर्जाचे अर्ज बँकेने नियुक्त केलेल्या कर्मचा-यांखेरीज इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीकडे देऊ नयेत. तसेच बँकानीही बाहेरील मध्यस्थ व्यक्तीमार्फत एकत्रितरित्या अर्ज स्वीकारु नयेत. इतर कोणत्याही बाहेरील अथवा त्रयस्थ व्यक्तीकडे दिलेला अर्ज ग्राहय धरला जाणार नाही. कोणतीही बँक यापध्दतीने एकगठ्ठा अर्ज स्वीकारत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सूचित केले आहे.
Leave a comment