आष्टी । वार्ताहर
आष्टी येथे अनिषा ग्लोबल स्कुल प्रांगणात जागतीक योगदिनानिमित्त आ.सुरेश धस यांनी देखील योगासनाचे धडे गिरविले. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन सर्व मिञ परिवार या योगासनाचे धडे गिरवीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
औषधोपचारासोबत अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी ’योगाभ्यास’ फायदेशीर ठरला आहे. या महाभयंकर अशा कोरोना महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व मानसिक मनोबल वाढवण्यासाठी योग खुप महत्वाचा आहे. त्यामुळे या योग दिनी आपण सर्वांनी संकल्प करत नित्यनियमाने योगा करावा व सदृढ रहावे असे आवाहन यावेळी आ.सुरेश धस यांनी केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून योगाभ्यास संपूर्ण जगाला मानवता, सामुदायिकता आणि एकतेची शिकवण देतो असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिनानिमित्त जनतेला संदेश घेऊन हा योगदिन भाजपा आ.सुरेश धस यांनी साजरा केला. यावेळी नगराध्यक्ष भारत मुरकुटे, नितीन शेठ मेहेर, राहुल मुथ्था, गिरीष जोशी, शफी सय्यद, अॅड.बाळासाहेब मोरे, बाळासाहेब खोडके, मॉर्निग ग्रुप, फ्रेंडशिप फिटनेस यांनी सहभाग घेतला होता.
Leave a comment