जागा मालक प्रा किशोर काळेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
बीड । वार्ताहर
कोरोना महामारीने सगळ्या जगालाच त्रासून सोडले आहे तीन महिन्यापासून सगळेच व्यवहार ठप्प आहेत अनेक छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले आहेत,कामगार मालक आर्थिक संकटात आहेत त्यातच दुकान भाडे कसे द्यायचे याचा प्रश्न निर्माण झाला मात्र जालना रोडवरील जवळपास 30 ते 35व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे येथील जागा मालक प्रा किशोर काळे आणि प्रभाकर काळे या बंधूनी आपल्या किरायदारांना लॉक डाऊन काळातील भाडे माफीचा निर्णय घेतला तसेच पुढील एक वर्ष कुठलीही भाडे वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने येथील व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे काळे बंधूंच्या या आर्दश निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे
दि.20/06/2020 रोजी प्रा.किशोर काळे यांनी जालना रोड रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील त्यांच्या सर्व भाडेकरुंचे लॉकडाऊन मधील संपूर्ण भाडे माफ केले असून या वर्षी कोणत्याही प्रकारची भाडे वाढ घेतली जाणार नाही असे सर्व भाडेकरू समक्ष जाहीर करून जालना रोड आणी ईतर भागातील जागा मालका समोर एक आदर्श निर्माण केला.प्रा किशोर काळे हे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे मित्र व कट्टर समर्थक आहेत सामाजिक सेवेत त्यांचा सातत्याने हातभार असतो लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर गाळे धारक अडचणीत सापडले होते उद्योग व्यवसाय बंद होते त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि व्यावसायिकांना मोठा आधार दिला आहे. आज सर्व किरायदारांनी आ.काकांचा सत्कार केला
Leave a comment