सुरुडीच्या सविता गर्जेंची उपअधीक्षकपदी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेल्या सविता मारुति गर्जे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपअधीक्षक तथा पोलीस उपायुक्त (पदावर निवड झाली आहे.या निवडीमुळे आष्टी तालुक्याला आणखी एक बहुमान मिळाला आहे. आष्टी तालुक्यातीलच रवींद्र भोसले हे सुध्दा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपअधीक्षक झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी असलेले मारुती गर्जे हे मुंबईत महानगर पालिकेच्या बेस्ट या उपक्रमात लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांची कन्या सविता गर्जे हिने नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपअधीक्षक पदी स्थान मिळवले आहे.सविता हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद संकुल सानपाडा नवी येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रामनिवास रुइया कनिष्ठ महाविद्यालय माटुंगा, मुंबई येथे तर औषध निर्माण शास्त्र पदवीचे (बीफार्मसी) शिक्षण बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मेसी,सांताक्रुज,मुंबई येथे झाले.सविताने2016 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला.एकदा परीक्षा ही दिली.2019 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नत तिला हे यश मिळाले.आता पुढेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवणार आहे असे सविता गर्जे हिने सांगितले.
Leave a comment