बीड । वार्ताहर
बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे अनाथ मुलांसांंठी सन 2016 पासून पसायदान सेवा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पासाठी बीड येथील सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणार्या स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानकडून स्व.पन्नालालजी नहार यांच्या स्मृतिनिमित्त 1 लाख रुपये किमंतीचे विद्युत रोहित्र भेट देण्यात आले. नुकतीच या रोहित्राची उभारणी करुन ते कार्यान्वीत केले गेले असल्याची माहिती गौतम खटोड यांनी दिली.
ढेकणमोहा येथील पसायदान सेवा प्रकल्पात 38 निराधार, अनाथ मुला-मुलींच्या राहण्यासह शिक्षण व भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च लोकसहभागातून केला जातो. वयाच्या 95 व्या वर्षी निवृत्ती अण्णा दराडे यांनी स्वत:ची जमिन विकून ढेकणमोहा येथे 2016 मध्ये निवृत्तीअण्णा दराडे यांचे चिरंजीव गोवर्धन व स्नुषा सौ. रंजना गोवर्धन दराडे यांनी या प्रकल्पास सुरुवात केली. या ठिकाणी राहणार्या विद्यार्थ्यांना 24 तास वीज मिळावी, अनाथ, निराधार विद्यार्थ्यांचे व्यवस्थित शिक्षण व्हावे या उद्देशाने खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता खटोड यांचे आजोबा स्व.पन्नालालजी नहार यांच्या स्मृतिनिमित्त पसायदान प्रकल्पास नुकतेच 1लाख रुपये किमतीचे विद्युत रोहित्र भेट दिले.यामुळे आता हा परिसर विजेने झळाळून निघाला आहे. याबद्दल पसायदान सेवा प्रकल्पाच्या वतीने गौतम खटोड यांचा सत्कार करुन त्यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकार्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Leave a comment