माजलगाव । वार्ताहर
माजलगाव, धारुर, वडवणी येथील राष्ट्रीयकृत बँकांनी शासनाच्या आदेशाला झुगारून मनमानी करत शेतकर्यांची सर्रासपणे पिळवणूक चालवुन, जाचक अटी लादुन, पेरणीच्या तोंडावर पिक कर्ज वाटपात जाणीव घोळ घातला जात असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शासनाने शेतकर्यांना पिक कर्ज वाटपाचे आदेश दिलेले असतांना बँकेच्या दारात पंधरा पंधरा दिवस चकरा मारुन देखील अधिकारी बेबी प्रमाणपत्र,फेरफार,कारखाण्यांचे हमीपत्र या सारख्या जाचक अटी लादुन पिककर्ज वाटपासाठी विलंब करत असल्याने पेरणी बाजूला सारुन शेतकरी बँकाचे उंबरठे झिजवत आहे.परंतु दलालांच्या व अधिकार्यांच्या सबंधित शेतकर्या शिवाय सामान्य शेतकरी कर्जापासुन वंचित आहे.
शेतकर्यांकडे बि-बियाणे, खते यासाठी पैसे नसल्याने चांगला पाऊस होऊनही शेतकर्यांची अद्याप पेरणी झालेली नाही. पिककर्ज वाटपात शेतकर्यावर होणारा अन्याय शेतकरी कामगार पक्ष कदापिही सहन करणार नाही, बँकांनी विनाअट तात्काळ पिक कर्ज वाटप करावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष माजलगाव च्या वतीने भाई अॅड. नारायण गोलेपाटील यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना दि. १७जुन रोजी निवेदन दिले आहे शेतकर्यांची अडवणुक थांबवुन तात्काळ पिक कर्ज वाटप न केल्यास दि. २० जुन रोजी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या कार्यालयासमोर गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भाई अॅड. नारायण गोलेपाटील यांनी दिलेला आहे.
Leave a comment