कर्ज माफीच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात
वडवणी । वार्ताहर
राज्य सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या आधार प्रमाणिकरणाच्या याद्या जाहीर केल्या परंतु आधार प्रमाणिकरणाची साईट बंद असल्याने शेतकर्यांचे कर्ज माफ न झाल्याने वडवणी तालुक्यातील स्टेट बँक व इतर बँक पिक कर्ज नामंजूर करत होत्या. या विषयी वडवणी भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव सावंत यांनी राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे, व तहसीलदार वडवणी यांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला यामध्ये आधार प्रमाणिकरणाची साईट सुरू झाल्याने शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
वडवणी तालुक्यातील शेतकर्यांना राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले या नावाने दोन लाखापर्यंत कर्ज मुक्ती दिलेली आहे त्या पात्र शेतकर्यांच्या नावाच्या याद्या हि प्रसिद्ध केलेल्या आहेत काही प्रसिध्द करणे बाकी आहे तरी शेतकर्यांना कर्जमाफी साठी आवश्यक असणारे आधार प्रमाणिकरणची साईट गेल्या अनेक महिन्या पासून बंद होती त्यामुळे शेतकर्यांच्या पिक कर्जाची रक्कम बँकेच्या कर्ज खात्यावर जमा न झाल्याने वडवणी तालुक्यातील स्टेट बँका व इतर या शेतकर्यांचे पिक कर्ज नामंजूर करत होते तरी या गंभीर विषयी वडवणी भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव सावंत यांनी नरेंद्र सिंग तोमर केंद्रीय कृषिमंत्री, हंसराज अहिर पुर्व केंद्रीय ग्रहराज्यमंत्री, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, राज्याचे शिवसेनेचे क्रषी मंत्री दादासाहेब भुसे, तहसीलदार वडवणी यांना लेखी निवेदन दिले व पाठपुरावा केल्याने प्रशासनाने आधार प्रमाणिकरणाची साईट सुरू केल्याने शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागला असुन शेतकर्यांना आता नवीन पिक कर्ज मिळणार आहे.
Leave a comment