खा. विकास महात्मे यांच्या माध्यमातून धनगर समाज संघर्ष समिती वडवणीचा उपक्रम

वडवणी । वार्ताहर

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ.पद्मश्री विकास महात्मे यांच्या माध्यमातून धनगर समाज संघर्ष समिती वडवणी तालुका यांचेकडून कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेसाठी म्हणून  बुधवारी (दि.17) प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथील डॉक्टर्स व ईतर कर्मचारी यांना पीपीई किट्सचे वितरण करण्यात आले.

कोरोना या महारिच्या काळात सर्व सामान्ये जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्व सामान्ये जनतेची अहोरात्र काळजी घेत जनतेला या संकटकाळात अविरत सेवा देणार्‍या कोरोना योध्दद्यांना त्याांच्या सुरक्षेेेसाठी म्हणून वडवणी येथिल प्राथमिक  आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व ईतर कर्मचारी यांना पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी धनगर समाज नेते संजय लकडे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री बाबुलाल ढोरमारे, धनगर समाज संघर्ष समिती वडवणीचे तालुका अध्यक्ष श्री शहाजी लोकरे, यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे, वैद्यकीय आधिकारी श्री.डॉ.अरुण मोराळे, डॉ.बाळासाहेब तांदळे, मच्छिंद्र नागरे, चालक घुले व ईतर कर्मचारी यांना या किट्ससचे वाटप  करण्यात आले यावेेेळी कार्यक्रमाचे आयोजक शहाजी लोकरे, दत्तात्रय वाघमारे, सुरेश ऐकाळ, बाळासाहेब लोकरे, भगवान कसपटे, नामदेव सातपुते, बबन वजीर, विक्रम चौरे, अमोल खंडागळे, मनोज चौरे, पोपट शिंदे, आकाश परबळे बलवंत गायकवाड, मनोज परबळे, बळी खनाळे, लहू गवळी, हनुमंत गवळी, पमु कानडे, दत्ता चौरे तसेच धनगर समाज संघर्ष समिती वडवणीचे सर्व सदश्यये व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.