बीड । वार्ताहर
बीड शहरातील पिंपरगव्हाण रोड लगत असलेल्या बंसिधर नगर भागात सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले असून या भागातील झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून शहरातील कामे सुरू झाली आहेत
बीड शहरातील पिंपरगव्हाण रोड लगत असलेल्या बंसिधर नगर भागात विविध विकास कामे पूर्ण होत असून यापूर्वी या भागात सिमेंट नाल्या पाईप लाईन आणि विद्युत खांब बसवून सार्वजनिक पथदिवे लावण्यात आले आहेत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नांमुळे बीड शहरातील विविध विकास कामे सुरु झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे रस्त्याची कामे करत असताना दोन्ही बाजूने वृक्ष लागवड देखील करण्यात येत आहे या वृक्षांची जोपासना त्या भागातील नागरिकांनी करावी व हरित बीडनगरी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a comment