डिग्रसच्या सिंधफणा पात्रात कारवाई 

दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टसह चार ट्राली जप्त

गेवराई । वार्ताहर

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरुच आहे. पोलीस आणि महसूलची पथके वारंवार कारवाया करत असले तरी वाळू माफियांना कायद्याची कसलीही भीती नसल्याचे स्पष्ट होत आहे. बुधवारी (दि.17) तलवाडा पोलीसांनी डिग्रस येथील नदीपात्रात वाळू उपसा करणार्‍यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस अन् पंचांना पाहताच वाहनचालकांनी वाहने सोडून धूम ठोकली. अखेर पोलीसांनी या कारवाईत 2 जेसीबी मशीन, तीन ट्रॅक्टर व चार ट्रॅक्टर ट्राली जप्त केल्या.

मागील काही दिवसांपूर्वीच वाळू वाहतूक करणार्‍या टिप्परचा पाठलाग करण्यासाठी गेलेले गेवराईचे प्रभारी तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या कारला टिप्परचालकाने पाठीमागून धडक दिली होती. या प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी धाव घेत महसूल व पोलीस यंत्रणेला वाळू चोरी रोखण्यासाठी कारवाया वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. कटचिंचोली (ता.गेवराई) येथे नदीपात्रात वाळू चोरी करणारे वाहने तलवाडा पोलीसांनी पकडली होती. त्यानंतर आता बुधवारी पुन्हा डिग्रस नदीपात्रात वाळू उपसा सुरु होता. माहिती मिळाल्यानंतर तलवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलीसांना पाहताच वाळू उत्खनन करणारे वाहने तेथेच सोडून पळून गेले. या प्रकरणी पोह.मिसाळ यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे अधिक तपास करत आहेत. या कारवाईत पोलीसांनी दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टरसह चार ट्राली असा तब्बल 48 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.