निवीदा निघूनही काम रखडले

धारूर । वार्ताहर

धारूर ते आडस या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. वाहनचालकाना अनेक अडचणीचा सामना करत वाहने चालवावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक असताना सार्वजनीक बांधकाम विभाग दुर्लक्ष  करत असून या रस्त्याचे 16 कि.मी.चे निविदा निघाली असून कोरोना आपत्तीमुळे काम रखडल्याचे सांगून उडवा उडवी करत आहेत. नागरिक माञ या लहरी कारभारामुळे वैतागुन गेले आहेत.

धारूर-आडस रस्ता हा अंबाजोगाई व लातूर जाण्या येण्यासाठी प्रमुख मार्ग झाल्याने वाहतूक वाढली आहे. वाहनांची संख्या वाढली आहे, मात्र धारूर ते आडस या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्या वर खड्डाचे साम्राज्य झाले असून वाहणधारकाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची ही अवस्था गेल्या एक वर्षापासून असून वाहनधारक वैतागुन गेले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. वार्षीक देखभाल दुरूस्ती मध्ये नोव्होबंर 2019 मध्ये या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची निविदा निघाली माञ पुढे खड्डे बूजवण्यात आले नाहीत. त्यामुळे हे काम कागदावरच तर झाले नाही आशी शंका व्यक्त केली जात असून सां बा विभागाचे कारभाराला प्रवाशी व वाहनधारक वैतागले आहेत.या रस्त्यावरील अपघात व प्रवाशाची गैरसोय थांबवण्या साठी तात्काळ खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थीत करावा आशी मागणी बंडोबा सांवत शाहूराव चव्हाण यांनी केली आहे.

सोळा कि.मी.चे काम होणार-पाटील

धारूर ते अंबाजोगाई रस्त्याचे धारूरपासून पुढे सोळा कि.मी डांबरीकरश कामाची निविदा प्रक्रीया चार कोटी रुपयांची निघाली आहे. प्रक्रीया पुर्ण झाली आहे पण कोरोना आपत्तीमुळे काम थांबवण्यात आले आहे अशी माहिती सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता एन.टी.पाटील यांनी दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.