पिंपळवंडी । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी व परिसरात मृग नक्षत्रातील पावसाने जोरदार व दमदार सुरुवात केल्याने परिसरात खरीप हंगाम पेरण्यांना सुरुवात झालेली आहे. रोहिणी नक्षत्रातील पावसानंतर मृग नक्षत्रातील पावसाने मागील आठवड्यात दिनांक 10 जून पासून या परिसरात दमदार हजेरी लावली. पिंपळवंडी येथून जवळच असलेल्या धोपटवाडी तलाव पावसाचे पाण्याने या वर्षी जूनच्या दुसर्या आठवड्यात शंभर टक्के भरला आहे.
या पावसामुळे परिसरातील अनेक नदी नाले ओढ्यांना काही प्रमाणात पूर येऊन गेल्याने नद्यांना पाणी वाहत आहे. पिंपळवंडी व परिसर डोंगरदर्यांच्या आहे. येथून जवळच असलेल्या धोपटवाडी तलाव पावसाचे पाण्याने या वर्षी जूनच्या दुसर्या आठवड्यात शंभर टक्के भरला आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने पाणी समस्या दूर झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण आहे. या तलावातील पाणी सांडव्यावरून वाहू लागल्याने पिंपळवंडी च्या नदीतून स्वच्छ पाणी वाहत आहे. यावर्षी या परिसरात मृग नक्षत्रातील पाऊस पेरणीयोग्य झाल्याने जून महिन्यातच परिसरातील पेरण्या पूर्ण होतील अशी बळीराजा अपेक्षा व्यक्त करत आहे. वेळेवर पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व बाजरी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड व पेरणी होताना चित्र पहावयास मिळत आहे.
Leave a comment