नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले नाल्यांचे पाणी

परळी । वार्ताहर

परळी नगरपालिकेने अस्वच्छतेचा कळस गाठला असून, शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग पडलेले आहेत. नाल्या कचर्‍याने तुडुंब भरल्याने पहिल्याच पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन ते लोकांच्या घरात व दुकानात घुसले आहे. याला जवाबदार सर्वस्वी नगरपालिका प्रशासन आहे तरी नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी खरमरीत टीका भाजपा नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी स्वछतेचे तीनतेरा वाजले असून जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भर मोंढ्यात टेलर लाईन च्या बाजूला चक्क रस्त्यावर मुतारी झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी बोगस नाल्याचे बांधकाम झाले असून त्यांचा उतार नेमका कोणत्या दिशेला आहे हे नगरपालिकेचा कोणताच कर्मचारी सांगू शकत नाही. मोंढा व शहरातील बहुतांशी भागात नाल्या तुंबल्याने कालच्या पावसाचे पाणी घरात व दुकानात घुसले असून या मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जागोजागी रस्त्यावर पडलेले कचर्‍याचे ढीग उचलले जात नाहीत. नाथ रोडवरील सगळ्या नाल्या कचर्‍याने भरलेल्या आहेत. त्या बुजून गेल्याने नाल्या मध्ये पाणी तुंबून बसत आहे. त्यामुळे गुरुकृपा नगर मधील लोकांच्या घरात पाणी घुसले तसेच रस्त्यावरील नाथ रोड वरील व्यापार्‍यांच्या दुकानात पाणी घुसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. संपुर्ण शहरात स्वछतेची यंत्रणा अपूर्ण पडतांना दिसत आहे आहे. मग महिन्याला स्वच्छतेपोटी होणारा 24 लाख रुपये खर्च कोणाच्या घशात जात आहे अशी टीका भाजपा नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली असून नगरपालिकेने मान्सून पूर्व स्वछतेची कामे त्वरित चांगल्या पद्धतीने करावीत अशी मागणी प्रा मुंडे यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.