नांदूरघाट । वार्ताहर
केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव ते पवारवाडी खरमटा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे, लोकप्रतिनिधीच्या व पुढार्यांच्या संख्य आश्वासनानंतर रस्त्याची परिस्थिती तशीच वाघेबाबळगाव येथून पवारवाडी खरमाठा आगेवाडी या तीनही गावाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यासाठी नागरिकांनी आनेकदा निवेदने दिलेली आहेत परंतु प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नाही. पावसाळ्यामध्ये तर चालता येत नाही. दळणवळणासाठी वाघेबाभूळगाव यावे लागते.
विद्यार्थ्यांना शाळेसाठी इतर दळणवळणाच्या गोष्टीसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो तेथील नागरिकांच्या मागणीवरून प्रशासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन आम्हाला तात्काळ रस्ता करून द्यावा, अशी मागणी देखील होत आहे. तेथील गावकर्यांच्या सांगण्यानुसार हा रस्ता दहा ते बारा वर्षापासून रखडलेला आहे. या गावाच्या रस्तयाबाबद राजकीय भेदभाव केला जातो या महत्त्वाच्या प्रश्नावर राजकीय पुढार्यांनी राजकारन करू नये असे देखील मधुसुधन पवार यांनी सांगितले. प्रशासनाने जर याची गंभीर दखल नाही. घेतली तर गावकर्यांच्या वतीने आंदोलन देखील करण्यात येईल त्यामुळे या रस्त्याचा मार्ग तात्काळ सोडवावा.
याबाबत पवारवाडीचे ग्रामस्थ मधुसुदन पवार म्हणाले, रस्त्याच्या प्रश्नाबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींकडे मागणी केलेली आहे प्रशासनाला देखील निवेदन दिलेले आहेत परंतु या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही आत्ता सध्या रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ रस्ता करून द्यावा तर वाघेबाभुळगाव येथील राजेभाऊ हांडगे म्हणाले, वाघेबाभूळगाव ते पवारवाडी खरमाटे या रस्त्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे वारंवार लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तात्काळ या रस्त्याचे काम करावे.
Leave a comment