बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून मंगळवारी (दि.16) सकाळी
तपासणीसाठी पाठविण्यात आलेले सर्व 87 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत.यात सर्वाधिक 72 स्वॅब बीडमधून पाठवण्यात आले होते, मात्र आजचे सर्वच स्वॅब निगेटिव्ह आल्याने बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठवण्यात येत आहेत. यात मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून 72, गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून 2, केज उपजिल्हा रुग्णालयातून 11 व अन्य 2 असे 87 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
अंबाजोगाईत तिघांना डिस्चार्ज
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड रुग्णालयात ४ जून रोजी सायंकाळी दाखल करण्यात आलेला एक पुरुष आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणारे दोन महिला रुग्ण अशा एकुण तीन कोरोना बाधीत रुग्णांना आज पुर्णपणे बरे झाल्यानंतर आज (१६ जून) सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी दिली.
Leave a comment