बीड -
किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झालेल्या केज तालुक्यातील माळेगाव येथील 60 वर्षीय महिलेचा आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सदर महिलेवर गत महिन्यात किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. नंतर 3 जूनला या महिलेने रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी परतल्यानंतर त्रास जाणवू लागल्या केजच्या खासगी रुग्णालयात त्या महिलेला नातेवाईकांनी दाखल केले परंतु तिथे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 10 जून रोजी पुन्हा त्या महिलेला औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात रेफर केले गेले होते. तेथे तिचा स्वॅब घेतला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, असे असतानाच आज मंगळवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे या महिला रुग्णाची बीड जिल्हा आरोग्य विभागात नोंद नाही, पोर्टलवर नोंद नसल्याने हा मृत्यू अद्याप तरी जिल्ह्यात गणला गेला नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातून आणखी 85 स्वॅब तपासणीला
बीड जिल्ह्यातून आज मंगळवारी (दि.16) सकाळी एकुण 85 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातूनही काही स्वॅब तपासणीला पाठवले जाणार आहेत ती माहिती यात देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठवण्यात येत आहेत. यात आज मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून 72, गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून 2, केज उपजिल्हा रुग्णालयातून 11 असे 85 स्वॅब तपासणीसाठी गेले आहेत.सायंकाळपर्यंत अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
आज दोघांना मिळणार सुटी
बीड जिल्ह्यात सोमवारी 68 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते, त्यातील बीड शहरातील दोघे कोरोना बाधित असल्याचे निदान झाले त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णाची संख्या 90 असून पैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे तर 64 कोरोनामुक्त झाले असून 24 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. या 24 पैकी 2 जणांना आज डिस्सार्ज मिळू शकतो अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment