शेतकर्यांकडून खरिपाची लगबग सुरू
वडवणी । वार्ताहर
तालुक्यात मान्सून पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली.काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला तर भारतीय हवामान खात्याने आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे.
सध्या तालूक्यात जोरदार पाऊस झाला.सकाळपासुनच येथे ढगाळ वातावरण होते. अखेर तिन ते चार दिवसापासुन रोज संध्याकाळी जोरदार पावसाचं आगमन झालं. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. तालूक्यात या पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.या पावसामुळे शेतात पेरण्यांना वेग आहे.कपाशीची लागवड करण्यास सुरूवात केली आहे दरम्यान पुढील पावसाची शक्यता आहे. ग्रामीण भागात 2 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पावसाची संततधार सुरू झाली आहे. 13 जून) दुपारी सहा वाजल्यापासुुन तालूक्यात पाऊस सुरू झाला होता त्यानंतर पुन्हा दोन दिवसात चागंला पाऊस पडल्यामुळे पेरणीला वेग आला आहे तर तालूक्यात काही. ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे पाऊसाच्या प्रतिक्षेत असणार्या शेतकर्यांना एक दिलासा मिळाला आहे.वडवणी शहरात देखील पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. काही परिसरात अनेक भागात नद्यांनाले पााणी भरल्याने वाहात आहेत त्यामुळे शेतकरी पेरणी करण्यात मग्ण झाले आहेत सध्या वडवणी तालूक्यात बहुंतश शेतकरी यांची पेरणीकडे ओढ आसल्याने वडवणी शहरात बाहेरून येणार्या शेतकरी राजाची गर्दी कमी होताना दिसत आहे कारण या आगोदरच बि -बियाने खते शेतीसाठी लागणारे औजारे आगोदरच घेऊन गेल्याने शहरात शेतकरी कमी प्रमाणात दिसुन येत आहे
Leave a comment