बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यांचे भूमिपुत्र प्रसिध्द नाट्य सिने अभिनेते, लेखन, दिग्दर्शक डॉ.सुधीर निकम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून चित्रपट ,साहित्य कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशंकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नियुक्ती केली.
मराठवाडा जशी संताची भूमी तशी कलावंताची सुध्दा भूमी आहे.नाट्य,मालिका आणि चित्रपट क्षेत्रात मराठवाड्यातील अनेक नामांकित कलावंतानी आपल्या नाव लौकिक केलेला आहे. या पैकीच एक नाव म्हणजे डॉ.सुधीर निकम,नाटक, मालिका सिनेमा असा गेवराई, बीड ते मुंबई असा खडतर प्रवा करत आज ते नामांकित चित्रपट दिग्दर्शक म्हणून कार्य करत आहेत. अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या असून त्यांनी साकारलेले गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधील महाराज हे पात्र घराघरात प्रसिध्द आहे. गत वर्षी त्यांनी प्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले, यतीन कार्येकर, भरत गणेशपूरे यांना घेवून खोपा या कौटूबिक चित्रपटाते लेखन दिग्दर्शन केले होते. त्याचे उचल, क्लीन बोल्डे, पोस्टर बाईज -2, छत्रपती ताराराणी आदी चित्रपटाची कामे चालू आहेत. गत तीस वर्षापासून ते नाट्य सिने क्षेत्राशी पुर्णवेळ सलग्न असून त्यांच्या अनेक नाट्यकलाकृतीने राज्य, देश पातळीवर बीड जिल्ह्याचा नाट्यक्षेत्रात आदरयुक्त दरारा निर्माण केलेला आहे. गेवराई च्या शारदा प्रतिष्ठान चे सांस्कृतिक प्रमुख म्हणनू देखील त्यांनी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली काही काळ काम केले आहे. कलावंताच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे डॉ. सुधीर निकम यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील चित्रपट कलावंताच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी बीड मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संपर्क कार्यालय बीड स्थापन करण्यात आले आहे.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे डॉ.सुधीर निकम यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मेल केले असून, लॉकडाऊन नंतर होणार्या पक्षाच्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ.निकम यांचे स्वागत करण्यात येणार आहे. डॉ.सुधीर निकम यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीह जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर, मा.आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, समता परिषद मराठवाडा अध्यक्ष अॅड.सुभाष राऊत, आ.भा.म. चित्रपट अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कार्यकारी निर्माते, संतोष साखरे, परळीचे मा.नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकार, गेवराई ,बीड, मराठवाड्यातील नाट्य मालिका चित्रपट कलावंत यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment