आष्टी । वार्ताहर

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बीड जिल्ह्यातील शाळा इमारत व नवीन खोल्यांसाठी 14 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी चार कोटी रुपये आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारत व नवीन खोल्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरु होणार असून आष्टी तालुक्यातील टाकळसिंग लोणी आष्टी येथील मुलींची कन्या शाळा पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळा डोंगरकिनी येथील जिल्हा परिषद शाळा या इमारत बांधकामासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे.

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला माध्यमिक शाळेतील शाळा इमारत बांधकाम प्रश्‍न अखेर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील अनेक माध्यमिक शाळा इमारत बांधकाम हे जीर्ण झाले असून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शाळा इमारत बांधकामासाठी पुढिल प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे.यात जिप माध्यमिक शाळा डोंगरकिन्ही ता पाटोदा 100 लक्ष रुपये.जि.प. माध्यमिक शाळा सौताडा 5 नविन शाळा खोली बांधकाम करणे 40 लक्ष रूपये.जि.प. माध्यमिक शाळा लोणी स.4 नवीन शाळा खोली बांधकाम करणे 35 लक्ष रुपये.जि.प.माध्यमिक शाळा टाकळसिंग नवीन इमारत बांधकाम करणे 80 लक्ष रुपये. जि.प. माध्यमिक शाळा आष्टी (मुलींची) नवीन इमारत बांधकाम करणे 100 लक्ष रुपये  असेएकूण चार कोटी रुपये  जिल्हा परिषद नियोजन समिती अंतर्गत शाळा इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यांनी सांगितले आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे त्यामुळे अनेक विकास कामे स्थगित करण्यात आली आहेत असे असले तरी अत्यावश्यक असणारी विकास कामे करण्यात येत असून मतदारसंघात विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आ.आजबे म्हणाले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.