धारुर । वार्ताहर
धारूर तालुक्यातील चाटगाव ते चाटगाव फाटा तीन किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला दिसत असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत तसेच या रस्त्यावरून वाहनधारकांना ये जा करताना कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावर मोठ-मोठी खड्डे पडलेले असल्यामुळे खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचे अपघात पण झालेले आहेत. तसेच चाटगाववरून फाट्यावर जायचे असेल तरी येथील ग्रामस्थांना या तीन किमी अंतर असलेल्या फाट्यावर जायला नकोसे वाटत आहे. तसेच कुठलीही निवडणूक असो त्यावेळेस मात्र लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, अनेक नेते मंडळी गावाकडे चकरा मारत असतात परंतु या रस्त्याची दुरवस्था झालेली असतानाही मात्र या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष जाणून-बुजून करत आहेत की काय अशी चर्चा चाटगाव येथील ग्रामस्थ मंडळीत होत आहे.तसेच चाटगाव ते फाटा हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी चाटगाव येथील सरपंच बालासाहेब केकान, वसंत सांगळे, बाळासाहेब सांगळे, श्रीधर सांगळे, राधाकिसन पोटे, शाहू पांढरे, अशोक तिडके, बाबासाहेब सांगळे, गोविंद केकान आदींनी केली आहे.
Leave a comment