गृहमंत्र्यांनी या घटनांचा गांभीर्याने विचार करावा
बीड । वार्ताहर
राज्यात वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात पँथर्स रिपाइं (मा मंत्री गाडे गट) गटाकडून तिव्र निषेध व्यक्त केला आहे. कोवीड (19) कलम 144 राज्यात लागु असल्याने काही आठवड्यापूर्वी गेवराई तालुक्यातील मौजे ब्रम्ह गाव येथील दलित कुटुबांनी बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळवली म्हणून त्या कुटुंबांच्या विरोधात कलम 307 नुसार खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे एका आदीवासी कुटुंबांतील तिघांना ठार करण्यात आले नागपूर येथील नारखेड येथे आंबेडकरी चळवळीतील अरविंद बनसोडे यांना जीवे मारण्यात तसेच मोजे चंदनापुरी (ता.अंबड जि.जालना) येथील दिपक चाबुकस्वार या युवकाच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार मौजे चंदनापुरी ता अंबड जि जालना येथे घडला.
पाच दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे विराज जगताप ची आँनर किंलिग झाली तसेच पैठण (जि.औरंगाबाद) येथील पाटेगाव येथे दि 11 तारखेला काही जातीयवाद्यांनी भिम सैनिक गौतम चाबुकस्वार हा गावातील चौकात निळ्या झेंड्याजवळ बसलेले असताना जातिवाचक शिवीगाळ करून त्याच्या वर शस्त्र तलवारी बंदुक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या ठिकाणी असलेला निळा झेंडा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला चबुतरा दगड लोखंडी दांड्याने तोडण्यात आला.शिल्पकार फ्रेंड्स ग्रुप या चौकाची नासधूस केली या संपुर्ण घटनांची पँथर्स रिपाइं कडुन तिव्र निषेध करण्यात आला वरील झालेल्या राज्यातील दलित अत्याचार थांबले नाहीत तर पँथर दनका देऊ असा इशारा पँथर्स रिपाइं प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील सर्व प्रकरणाची कायदेशीर चौकशी करुन ते विशेष न्यायालयात चालवावेत कायद्यातील तरतुदीनुसार अत्याचार ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी वाढते अन्याय अत्याचार थांबवण्यात यावे अशी मागणी पँथर्स रिपाइंचे प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांच्यासह पँथर्स रिपाइं तालुकाध्यक्ष भास्कर उघडे युवा तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे पँथर्स विद्यार्थी तालुकाध्यक्ष अविनाश आडगळे रिपाइं मिडिया तालुकाध्यक्ष आकाश लोखंडे युवा नेते आकाश मोरे शेख नजीर बाबा दाभाडे गांऊजी दाभाडे युवा उपाध्यक्ष विकास वारे पँथर्स रिपाइं तालुका उपाध्यक्ष कृष्णा हतागळे भिमराव पौळे अंकुश धापसे युवा पत्रकार राजु खळगे इत्यादींनी केली आहे.
Leave a comment