गेवराई । वार्ताहर
पावसाचे पाणी सलुनच्या दुकानात घुसल्याने पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गेवराई शहरतील ताकडगाव रोडवर घडली.शहरातील ताकडगाव रोडवर दिपक जेंटस पार्लर हे दुकान असून सोमवारी दुपारी चार नंतर गेवराई शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला.या
झालेल्या पावसात रस्त्यावरील पाणी या दुकानात घुसले होते. दरम्यान पाऊस उघडल्यानंतर दिपक दादाराव छेडदार याने दुकान उघडून आत पाय ठेवताच त्याला विजेचा जोरदार दणका बसल्याने तो खाली कोसळला ही बाब शेजारच्या दुकानदाराच्या लक्षात आली असता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरील मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात केला आहे. या घटनेबाबत गेवराई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment