काम चांगले होण्यासाठी आ.पवारांनी लक्ष घालावे
तलवाडा । अतिख शेख
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे उंच डोंगर माथ्यावर महाराष्ट्रत प्रसिद्ध आसे पुरातन जागृत व जाज्वल्य आई त्वरिता देवीचे मंदिर असुन या त्वरिता देवीच्या अख्यायिकेमुळे राज्यभरातून हजारो भक्तगण आपले नवस फेडण्यास व दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी रस्ता काम सुरु आहे, मात्र काम चांगले होत नसल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.
तलवाडा येथील त्वरिता देवीच्या दर्शनाला राज्यभरातून येणार्या भाविकांच्या सोयीनुसार डोंगर माथ्यावर जाण्यासाठी एक डांबरी रस्ता असुन या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाविकांच्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीला प्रतिसाद देत या रस्ता कामाला मंजूरी देऊन प्रत्यक्ष कामाला केलेली सुरुवात अभिनंदनीय असली तरी रस्ता कामाची सुरुवात व शेवट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काण फक्त दोनशे मीटर रस्त्यासाठीच या कामात दुजाभाव का? आमदार साहेब काम चांगले होत नसल्याची खंत गावकर्यांतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगले केले जावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.
Leave a comment