धारुर । वार्ताहर
शेतीच्या वादातून सोनिमोहा येथे रावसाहेब बबन दराडे यांच्या डोक्यात कुर्हाडीचा वार करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.15) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात घडली. यात अन्य तिन जन जखमी झाले आहेत.
सोनिमोहा शिवारात शेतीच्या बांधावरील कुरबुरीवरून रामहारी पांडूरंग दराडे, सुदाम पांडूरंग दराडे, पांडूरंग दराडे व अन्य चार महिलांनी एकत्र येत भांडणाच्या तयारीने येवून व जीवे मारण्याच्या हेतूने कुराड, तलवार घेवून रावसाहेब बबन दराडे, बबन सादबा दराडे, राणी बालासाहेब दराडे, आश्वीन रावसाहेब दराडे यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी रावसाहेब दराडे यांच्या डोक्यात रामहारी दराडे याने कुर्हाडीचा वार केला. यात रावसाहेब दराडे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वेळी बबन दराडे, राणी दराडे, आश्वीनी दराडे यांनाही मार लागला आहे. या भांडणात कुर्हाड, तलवारीचा वापर झाल्याने सोनिमोहा येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत धारुर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Leave a comment