बीड । वार्ताहर
बीड शहरातील मसरतनगर आणि झमझम कॉलनीत आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात झमझम कॉलनीतील एका 34 वर्षीय तरुणाचा तर मसरतनगर येथील 13 वर्षीय मुलाचा समावेश आहे. उर्वरित 66 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यातून सोमवारी (दि.15) सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 21,कोव्हीड केअर सेंटर बीड-41, परळी उपजिल्हा रुग्णालयातून 1 स्वॅबचा होता तर अन्य स्वॅब अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून तपासणीला पाठवण्यात आले होते. यातील बीडमधील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर 66 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकुण 82 कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे. त्यापैकी 58 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. आता जिल्ह्यात 25 रुग्ण उपचार घेत असून याशिवाय मुंबईत 3 तर पुणे आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी 2 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. रविवारी तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवलेले सर्वच 143 व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने बीड जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र सोमवारी आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे.
15
Jun
Leave a comment