बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज सोमवारी (दि.15) सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी 63 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 21, कोव्हीड केअर सेंटर बीड-41 तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातून 1 स्वॅबचा समावेश आहे. ही माहिती अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय वगळून आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकुण 82 कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे. त्यापैकी 58 जण कोरोनामुक्त होवून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात 23 रुग्ण उपचार घेत असून याशिवाय मुंबईत 3 तर पुणे आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी 2 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.रविवारी तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवलेले सर्वच 143 व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने बीड जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
------
Leave a comment