बीड तालुक्यातून सर्वाधिक 72 तर परळीतून 28 स्वॅब तपासणार

बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्यातून आज रविवारी (दि.14) सकाळी 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत.यात बीड तालुक्यातून सर्वाधिक 72 स्वॅबचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली. 

तपासणीला पाठवलेल्या स्वॅबमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातून 49, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 23 असे एकुण 72 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून 18, कोव्हीड केअर सेंट अंबाजोगाईतून 11 केज उपजिल्हा रुग्णालय 1,आष्टी ग्रामीण रुग्णालय 2, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 4 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 28 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचा समावेश आहे. पहाटे साडेपाच वाजता हे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले असून आज सायंकाळपर्यंत सर्व रिपोर्ट प्राप्त होवू शकतात. दरम्यान बीडच्या मसरतनगरमधील बाधीत व्यक्ती एसबीआय तसेच रजिस्ट्री कार्यालय परिसरात जावून आली होती, त्यामुळे संबंधितांना होम क्वाँरटाईन होण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत तर जालना रोड एसबीआय व रजिष्ट्री कार्यालय बंद करण्यात आलेले आहे. याशिवाय परळीतूनही आज 28 जणांचे स्वॅब तपासणीला गेले आहेत. शनिवारी पाठवलेल्या 99 पैकी तब्बल 89 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आता आजचे रिपोर्ट काय येतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.