आठ जना विरोधात गुन्हा दाखल

बीड -

शहरातील मसरत नगर भागातील ज्या कुटुंबामुळे शहर वासीयांचा जीव धोक्यात आला,होम क्वारान्टीन असताना जे लोक घराबाहेर पडून शहरात मोकाट हिंडले,लग्नाला गेले ,तसेच कोविड सेंटर येथे स्वॅब घेण्यास नकार देत शासकीय कामात अडथळा आणला अशा सहा जनासह अख्तरी मस्जिद मधील मुलामुलींच्या वाडीलविरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे होम क्वारान्टीन चा नियम मोडणाऱ्यांना वेसन लागणार हे नक्की .
मागील आठवड्यात बीड शहरातील मसरत नगर भागातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या अन प्रशासनासाहित शहरवासियात खळबळ उडाली .हे पॉझिटिव्ह आलेले लोक हैदराबाद येथून प्रवास करून परत आले होते,त्यानंतर त्यांना होम क्वारान्टीन राहण्यास सांगितले असताना देखील यातील काही लोकांनी लग्नाला हजेरी लावली,त्यानंतर शहरभर फिरत बसले .
त्यामुळे बीड शहरातील अनेक भागात ते गरल्याने धोका निर्माण झाला होता .या प्रकरणात होम क्वारान्टीन न राहता शासन नियम पायदळी तुडवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल का केला नव्हता मात्र प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भात वृत्त आल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली
अखेर शनिवारी रात्री बारा वाजता होम क्वारान्टीन न राहता घराबाहेर पडून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मसरत नगर भागातील एकाच कुटुंबातील पाच,अन्य तीन लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,विशेष म्हणजे यात विना परवानगी लग्न आयोजित करून त्या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त लोक जमा करून सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी फेरोज पठाण या सह वधू आणि वराच्या वाडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तसेच सीसीसी सेंटर येथे शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी आणि स्वॅब घेण्यास मज्जाव केल्याप्रकरणी या कुटुंबाच्या नात्यातील व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.