केज । वार्ताहर
केज तालुक्यातील धनेगाव (कॅम्प) येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागील राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनापर्यंत राज्यात रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या सूचनेनुसार हे शिबीर घेण्यात आहे. या अनुषंगाने धनेगाव येथे शनिवारी (दि.13) शिबीर पार पडले. यात 33 दात्यांनी रक्तदान केले.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे व त्यांच्या मित्र परिवाराने हे शिबीर आयोजीत केले. शिबिरात केळी व बिस्किटाची सोय कैलास खोडसे यांच्या वतीने तर मास्क वाटत जनविकास सामाजिक संस्थेचे बाबा पोटभरे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश खोडसे, हरीष जगताप,उत्रेश्वर चेडे,सचिन शिंपले,स्वप्नील अंबुरे,काका गवळी,गोविंद टोणगे,सिद्धेश्वर खोडसे,दत्ता मुजमुले, सुनील वाळके,विश्वजीत खोडसे, किरण खोडसे, अक्षय खोडसे तसेच इतर मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.
Leave a comment