दहा वर्षानंतर प्रथमच नदीला पूर
चौसाळा । वार्ताहर
बीड तालुक्यातील चौसाळा व परिसरात शनिवारी (दि.13) मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात येथील नदीला दहा वर्षानंतर पहिल्यांदाच पूर आला. त्यामुळे वाढवणा-पिंपळगाव वाहतूक काहीवेळ बंद पडली होती. जोरदार पावसामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान परिसरातील हिंगणील वानगाव, मोरगाव, मांजरसुंबा आदी परिसरातही चांगला पाऊस झाला आहे.
शनिवारी चौसाळा परिसरात आभाळ दाटून आले अन् काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता की, सर्वत्र पाणीच पाणी होऊन दहा वर्षात पहिल्यांदाच चौसाळा शहराच्या जवळ असलेल्या नदीला मोठा पूर आला. यामुळे चौसाळा वाढवणा- पिंपळगाव वाहतूक काही काळ बंद पडली होती तर चौसाळ्यातील या भागातील शेतकर्यांना गडाकडे परतण्यासाठी जुन्या औरंगाबाद सोलापूर रोडवरील पुलावरून परतावे लागले. या पावसामुळे यावर्षीच्या हंगामात पाण्याची कमतरता भासणार नाही, त्यामुळे चौसाळा परिसरातील शेतकरी सुखावले आहेत.
Leave a comment