पाटोदा । वार्ताहर
शेतीच्या बांधावरुन तालुक्यातील मूगगाव येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी शुक्रवारी परस्परविरोधी फिर्यादीवरुन तब्बल 21 जणांवर गुन्हा नोंद झाला.
मूगगाव येथे देविदास मारुती खोटे व संतोष गोरख खोटे यांची चिकटून जमीन आहे. बांधावरुन दोन्ही कुटुंबात धुसफूस सुरु होती. 8 जून रोजी बांधाच्या कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली, त्यानंतर दोन गट समोरासमोर भिडले. देविदास खोटे यांच्या फिर्यादीनुसार, स्वत:च्या शेतात बांध टाकत असताना काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. संतोष खोटे, दत्तू खोटे, परमेश्वर खोटे, अशोक खोटे, राजेंद्र खोटे, पोपट खोटे, गोरख खोटे, संजय खोटे यांच्यावर अंमळनेर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. संतोष खोटे यांच्या तक्रारीनुसार, बांधाच्या कारणावरुन आरोपींनी लोखंडी सळई डोक्यात मारली. नाक, तोंड दाबून खाली पाडून मारहाण केली. यावरुन देविदास खोटे, अशोक खोटे, गोकुळ खोटे, सोमीनाथ खोटे, अंकुश खोटे, बापूराव खोटे, ज्ञानदेव खोटे, सुधाकर खोटे, देविदास सुधाकर खोटे, युवराज खोटे, दीपक खोटे, सुभाष खोटे, गणेश खोटे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
Leave a comment