बीड । वार्ताहर
एकाच्या नावाने परवाना असताना दुसराच चालक पुण्याहून बीड जिल्ह्यात ट्रॅव्हल्स घेऊन आला. विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी पाटोदा पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी फाटा येथे शुक्रवारी पाटोदा पोलिसांना पुण्याहून धारुरकडे एक ट्रॅव्हल्स विनापरवाना जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून ट्रॅव्हल्स (क्र.एमएच 23 डब्ल्यू-4560) अडवून चौकशी केली. यावेळी शौकत अहमद शेख (रा. अंबाजोगाई) याच्या नावे वाहतुकीचा परवाना आढळला. मात्र, प्रत्यक्षात शेख महेबूब शेख उस्मान (रा. अजिजपुरा, धारुर) हा चालक असल्याचे निष्पन्न झाले. या ट्रॅव्हल्समध्ये दोन प्रवासी व एक डिकीत एक दुचाकीही आढळून आली. विनापरवाना वाहतूक केल्यावरुन हवालदार मधुकर कंठाळे यांच्या फिर्यादीवरुन शौकत अहमद शेख व शेख महेबूब शेख उस्मान यांच्यावर फसवणूक, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment