केज नगर पंचायतीची मुदत नजीकच्या काळात संपत आहे
मुंबई। वार्ताहर
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता संपत आला आहे. त्यामुळे जे निर्णय थांबवण्यात आले होते. त्याबद्दल हालचालींना वेग आला आहे. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यांची मुदत आता संपत आली असून प्रशासक नेमणूक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकांची गर्दी टाळण्यासाठी औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार या तीन महापालिकांची निवडणूक पुढे ढकल्यात आली होती. परंतु, या तिन्ही पालिकांसाठी देण्यात आलेली मुदत संपत आहे. त्यामुळे या तिन्ही पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे, त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहे.
प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगानं याबद्दल नगरविकास खात्याला पत्र दिले आहे. निवडणुका घेता येत नसल्यानं मुदत संपताच प्रशासक नेमावा लागणार आहे.
औरंगाबादमध्ये 29 एप्रिल पूर्वीच अस्तित्वात येणे बंधनकारक होते. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही. त्यामुळे पालिकेची मुदत आज संपत आहे. त्यानंतर प्रशासक नेमला जाईल. पालिकेचा संपूर्ण कारभार हा पालिका आयुक्तांकडे जाईल. तर नगरपरिषद निवडणुकीची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओची निवड होईल.
तर, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, भोकर, मोवाड व वाडी या आठ नगरपालिका, केज नगर पंचायतीची मुदत नजीकच्या काळात संपत आहे.
राज्यातील पालिकांना अशी आहे मुदत
औरंगाबाद महापालिका- 28 एप्रिल 2020
भडगाव (जळगाव) नगर परिषद- 29 एप्रिल 2020
केज (बीड) नगर पंचायत- 1 मे 2020
नवी मुंबई महापालिका- 07 मे 2020
भोकर (नांदेड) नगर परिषद- 9 मे 2020
मोवाड (नागपूर) नगर परिषद- 19 मे 2020
वाडी (नागपूर) नगर परिषद- 19 मे 2020
कुळगाव-बदलापूर नगर परिषद- 19 मे 2020
अंबरनाथ नगर परिषद- 19 मे 2020
राजगुरूनगर (पुणे) नगर परिषद- 15 मे 2020
वसई-विरार महापालिका - 19 जून 2020
वरणगाव (जळगाव) नगर परिषद- 5 जून 2020
Leave a comment