राष्ट्रपती भवन परिसरात एका महिलेला कोरोनाची लागण
नवीदिल्ली । वृत्तसेवा
देशभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस आता थेट राष्ट्रपती भवन पर्यंत पोहचला आहे. राष्ट्रपती भवन परिसरात एका महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या सूचनेनुसार 125 परिवारांना एकांतवासात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामूळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती राष्ट्रपती भवनातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव आल्यावर या महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, या महिलेच्या सासूचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. कोरोनाग्रस्त सासूच्या संपर्कात आल्याने तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या संपर्कात राष्ट्रपती भवन परिसरात काम करणारे 100 पेक्षा अधिक जण होते. यामध्ये सफाई कर्मचारी, माळी अन्य कर्मचारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, या महिलेच्या मुलींमध्ये देखील कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. मात्र, तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
Leave a comment