कोरोनामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती ठीक होईपर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन न करण्याचा निर्णय रामजन्मभूमी ट्रस्टने घेतला आहे. देश संकटात असताना अशा प्रकारचे कार्यक्रम करणे चुकीचे आहे, असे राम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 30 एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रामलल्लाची नव्या भवनात प्रतिष्ठापना करून, वैशाख नवरात्र संपल्यानंतर 30 एप्रिलला भूमीपूजनाबरोबरच राम मंदिराच्या निर्माणालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, कोरोनामुळे राम मंदिर निर्माणाला सध्या ब्रेक देण्यात येणार आहे. देशातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राम मंदिराच्या भूमीपूजनाचा विचार करण्यात येणार आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी देशातील काही निवडक संत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबतची चर्चा केली होती.
Leave a comment