केज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुद्देमालासहआरोपी ताब्यात
केज । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये दारु पिणार्यांची हौस भागत नसल्याने काही करुन दारु मिळवण्यासाठी केले जाणारे नवनवीन कारनामे समोर येवू लागले आहेत. केज शहरात आता नवीनच उदाहण समोर आले आहे. चक्क पाण्याच्या जारमधून दुचाकीवरुन अवैद्यरित्या गावठी दारुची वाहतूक केली जात होती. हा प्रकार लक्षात येताच केज पोलिसांनी सापळा रचून गावठी दारू आणि वाहतूक करणारे दोघे व मुद्देमाल ताब्यात घेतले.
शहरातील कानडी चौकात सोमवारी (दि.20) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.दोन व्यक्ती एका दुचाकीवरुन सिटवर दोन पाण्याचे जार बांधून जात होते. त्यावेळी चौकात बंदोबस्तावर असलेले पो.ना.बाळासाहेब अहंकारे यांना संशय आल्याने त्यांना अडवले. त्यांनी जार उघडून पाहिले असता त्यातून गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. त्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 36 लिटर गावठी दारू ताब्यात घेण्यात आली.पो.ना. अहंकारे यांच्या फिर्यादीवरुन राम दिलीप काळे, कमलाकर दशरथ राऊत आणि अनिल लोखंडे ( सर्व रा. सर्व केज) या तिघांवर केज ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईबद्दल बाळासाहेब अहंकारे यांचे कौतुक होत आहे. उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.
Leave a comment