परळी । वार्ताहर
परळी शहरातील दत्त मंदिर ट्रस्ट जागेत किरायाने असलेले अनिल जाधव यांचे सोनाली फर्निचर अँड उडन फर्निचर या गोडाऊनला भीषण सोमवारी (दि.20) आग लागली. सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या या आगीने गोडाऊनमधील फर्निचरला कलर करणारी भट्टी व पेंट ड्रम हे सर्व आगीत भस्म झाले असल्याचे दिसले परंतु ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्तात बंद आहे.
यावेळी आग लागल्या ठिकाणावरून अग्नीशामक दल यांना शहरातील एका व्यक्तीने सांगितले त्या क्षणी अग्निशाम बंब या ठिकाणी पोहचले. परंतु मोठ्या कसरतीने सुनील रोडे यांनी तब्बल 35 मिनिटात आग आटोक्यात आणली परंतु यावेळी आग लागल्या ठिकाणी ही आग विद्युत पुरवठा्रने लागली असे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असून सुद्धा सदर गोडाऊन चालू असल्याने जिल्हाधीकारी यांच्या आदेशास डावलून चालू ठेवला अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये सुरु होती. गोदाम मालकाला वारंवार नगरपरिषदेने नोटीस बजावली की तुम्ही कायदेशीर परवाने घ्या व नियम पाळा. या करिता कादेशीर नोटीस दिले असून देखील या नोटीस न पाहता कारागिरांच्या जीवाची पर्वा न करता आवश्यक असणारे आग विझवण्याचे यंत्रणा कोणतीही या ठिकाणी आढळून आली नाही.
Leave a comment