केज । वार्ताहर
तालुक्यातील डोका येथे असलेल्या महिलेचा गावातील तिघांनी एका 35 वर्षीय महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. तर विरोधी गटाच्या तक्रारीवरुन अन्य सहा व्यक्ती विरोधातही मारहाण करून दगडाने डोके फोडून दुखापत करणे आणि साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास संपत विठ्ठल भांगे, रघुनाथ कल्याण भांगे आणि कल्याण भांगे (सर्व रा.डोका) यांनी डोका शिवारातील शेतात पारधी वस्तीवरील एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केला. भांडण सोडविण्यास आलेल्या तिच्या दिराला पण मारहाण केली. पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुध्द केज ठाण्यात वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. उपअधीक्षक राहुल धस हे तपास करत आहेत.
दुसर्या गटातील संपत विठ्ठल भांगे यांनीही सुंदर उजैन पवार, बन्सी सुंदर पवार, भास्कर सुंदर पवार, सुनील सुंदर पवार, राहुल सुंदर पवार आणि बबलू सुंदर पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, ते व त्यांचा पुतण्या हे रविवारी दुपारी शेतात होते. त्यावेळी वरील सर्व सहाजण त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवजा घरासमोर एकत्र बसले होते. संपत भांगे यांची पत्नी गावात आशा स्वयंसेविका म्हणून काम करीत आहे. कोरोना विषाणू साथरोग सुरू असल्यामुळे ते तुम्ही एकत्र का बसलात? असे ते म्हणाले. त्याचा राग येऊन सुंदर उजैन पवार, राहुल सुंदर पवार, बबलु सुंदर पवार यांनी त्या दोघांना लाथाबुक्कयाने मारहाण केली.डोक्यात दगड मारून डोके फोडून दुखापत केली. यावरुन सहा जणविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोहेकॉ. अमोल गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment