आष्टी । वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यामध्ये होऊ नये यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्या ऊसतोडणी कामगारांची तपासणी करून त्यांना बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येत आहे.यासाठी आष्टी तालुक्यातील चारठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. या चार चेकपोस्टच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांना आष्टी तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जातेवेळी प्रशासनास मदत म्हणून खेड्यातील खाजगी डॉक्टर मदतीला धावून आले आहेत.
आष्टी तालुक्यातील बहुसंख्य ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्र मध्ये ऊस तोडण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून गेले होते त्यानंतर परत येते वेळी कोणाच्या संकटामुळे ते जाग्यावरच कारखान्यावर अडकून पडले होते शासन निर्णयानुसार दोन दिवसांपूर्वी ऊसतोड मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली असून मोठ्या संख्येने तालुक्यात ऊसतोड मजूर परतू लागले आहेत परंतु या ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी विविध चेक नाक्यावर होत असून यासाठी खेड्यातील खाजगी डॉक्टर दिवस-रात्र आळीपाळीने ड्युटी करून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत तपासणी करतेवेळी सर्दी खोकला ताप डोकेदुखी इत्यादी आजाराची तपासणी करत असून त्या मजुरांना फोन करून टाईम या डॉक्टर मार्फत केले जात आहे यामध्ये डॉ प्रमोद भळगट, डॉ शिवाजी शेंडगे ,डॉ.प्रताप गोरे ,डॉ प्रताप मार्कंडे,डॉ उमेश गांधी ,डॉ.अण्णा गाडे ,डॉ सुनील बोडखे आदींचा समावेश आहे.
Leave a comment