बीड । वार्ताहर
दीनदयाल शोध संस्थान संचलित, गोकुळ शिशुवाटिकेत वृक्षाला राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या स्नेह व अतूट बंधनाचा सण म्हणून साजरा केला जातो. हे वर्ष पर्यावरण पूरक वर्ष म्हणून राबवले जात आहे. त्या निमित्ताने झाडाला राखी बांधण्यात आली व विद्यार्थ्यांना झाडाची पाने फुले तसेच कागदाच्या पेपरपासून राखी तयार करणे हा एक अनोखा उपक्रम घेतला.
सर्वप्रथम सर्व गटातील मुलांना गोकुळ शिशुवाटिका प्रमुख सौ स्नेहलताई देशपांडे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. व वृक्षाला राखी बांधून राखी पौर्णिमेला सुरुवात केली. त्यानंतर मुलांना व मुलींना कुंकू लावून औक्षवण करण्यात आले. व मुलगा व मुलगी हा भेदभाव न ठेवता मुलांनी मुलींना व मुलींनी मुलांना राख्या बांधण्यात आल्या. मुलांनी मुलींना वेगवेगळे खाऊ व भेटवस्तू दिल्या. त्यामध्ये स्वच्छंद गटातील देवांश लोमटेच्या पालकांनी स्वइच्छेने सर्व मुलांसाठी खाऊ दिला.
Leave a comment