कष्टकरी मजूर ,शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधी
नेकनूर | वार्ताहर
तीन महिन्यापासून बंद असलेल्या जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेच्या अध्यक्षांनी नेकनूरमध्ये लोकांना काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते मात्र मोठा कालावधी लोटूनही शाखा उघडत पैसे मिळत नसल्याने अखेर ठेवीदारानी तक्रार करण्यासाठी नेकनूर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली. नेकनूर शाखेत आठ ते दहा कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे विलास हजारे यांनी सांगितले
नेकनूरमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने त्यातच मराठी भाषिक कर्मचारी नसल्याने या ठिकाणी अशिक्षित माणसांना व्यवहारासाठी वेळ आणि अडचणी निर्माण होत असल्याने अनेक नागरिकांनी व्यवहारासाठी पतसंस्थेचा मार्ग निवडला . पंधरा वर्षात नेकनुरच्या सामान्याच्या मनात अनिता बबन शिंदे यांच्या जिजाऊ मासाहेब पतसंस्थेने घर केले. नातेगोत्यांची बँक यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवीदार ठेवी ठेवत यामध्ये प्रामुख्याने कष्टकरी शेतकरी वर्गाचा मोठा समावेश आहे. पै पै जमा करून अनेकांनी विवाह, दवाखाना, शेती कामे या कारणाने या ठिकाणी पैसे डिपॉझिट केलेले होते . तीन महिन्यात पतसंस्था एकदम डबघाईला आल्याचे कारण दाखवत ठेवी देण्यास असमर्थता दाखवण्यास सुरुवात केली.यादरम्यान तीन वेळा शाखेत येऊन गोल्ड लोनचे पैसे घेत काही खातेदारांना पंधरा, वीस हजार देत उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन शिंदे दापत्याने दिल्याने ठेविदारांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र दिलेल्या अनेक तारखा उलटून गेल्याने बीडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नेकनूर येथील शाखेतील ठेवीदारांनी सोमवारी सकाळी 11 वाजता नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली सपोनि विलास हजारे यांनी लोकांचे मनने ऐकून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे उपस्थित लोकांना सांगितले.
Leave a comment