धोंडराई येथील झोपडपट्टी भागातील घटना 

धोंडराई | शाम जाधव 

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील झोपडपट्टी भागात  घराची भिंत अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी घडली आहे.सुमनबाई शेषेराव आडागळे वय ५५ वर्षे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.भिंत अंगावर पडल्याने सुमनबाई ह्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले होते.दरम्यान गंभिर रित्या जखमी असल्याने त्यांचा मृत्यू झाला.

परिस्थिती हलाखीची असल्याने सुमनबाई आडागळे ह्या बिकट अवस्था असलेल्या घरात राहत होत्या.त्या राहत असलेल्या घराला तडे पडलेले असुन भिंती ही पडलेल्या आहेत.कुठतरी आपल्याला राहायला आसरा म्हणुन शासनाकडून घरकुल मिळेल या विवंचनेतुन सुमनबाई यांनी पडलेल्या भिंती जवळ उभे राहुन फोटो देखील काढले होते मात्र ते कोणत्या कार्यालयात दिले होते याची माहिती मिळु शकली नाही.असे असताना मात्र घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरांचा लाभ गरज आहे त्यांना मिळत नसल्याने अशा घटना समोर येतात.सुमनबाई आडागळे यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असता तर तडे गेलेल्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती जेव्हा आम्ही रिपोर्ट करण्यासाठी घटनास्थळी गेलोत तेव्हा घराची अवस्था पाहून आम्हालाही धडकी भरली. घटनास्थळी महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या मृत्यू नंतर तरी धोंडराई सह राज्यातील घरकुल योजनेत होणारा गैरप्रकार रोखुन खऱ्या लाभार्थ्यांना याचा 
लाभ मिळेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.