एसपी हर्ष पोद्दार यांच्या हस्ते शुभारंभ
बीड । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य आजाराची लढा देणार्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी शनिवारी (दिे.18) बीड जिल्हा पोलिस दलात तीन सॅनिटायझर व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते या व्हॅनचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व उपविभागात या सॅनिटायझर व्हॅन फिरतीवर राहणार आहेत. जिल्ह्यातील चेकपोस्ट तसेच नाकाबंदीसाठी नियुक्त असणार्या अधिकारी कर्मचार्यांना बंदोबस्ताला जाताना व बंदोबस्त संपल्यानंतर परतताना या सॅनिटायझर व्हॅनमधून कर्मचार्यांना बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था या व्हॅनमध्ये केली गेली आहे. त्याचे फवारे या व्हॅनमधून बाहेर पडतात,जेणेकरुन निर्जंतुकीकरण तात्काळ होते. जिल्ह्यातील बीड, आष्टी, केज, माजलगाव, अंबाजोगाई व गेवराई या उपविभागामध्ये या तीन सॅनिटायझर व्हॅन फिरणार आहेत. शुभारंभप्रसंगी अप्पर अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment