पिंक मोबाईल पथक प्रमुखांना एसपींच्या हस्ते साहित्य वितरित

 

बीड | वार्ताहर

 

 महिला संबंधीच्या गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करून निपटारा करावा.तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा  व असे गुन्हे करणाऱ्या आरोपीस कडक शिक्षा होईल अशा रीतीने तपास करून कमीतकमी वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे अशा सूचना पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी पिंक मोबाईल पथक प्रमुखांना केल्या.

 

पिंक मोबाईलसाठी महिला संबंधीच्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने व पारदर्शक व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली  पिंक मोबाईल पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या पथक प्रमुखांची गुरुवारी (दि.२३) बैठक पार पडली.यावेळी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या हस्ते पथक प्रमुखांना साहित्य वितरित करण्यात आले.

 

 

यावेळी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी पथक प्रमुखांना सूचना करतानाच त्यांच्या अडचणीबाबतही विचारणा केली. महिला संबंधी गुन्ह्यांचा तपास सुरळीत व जलद गतीने व्हावा यासाठी प्रत्येक पिंक मोबाईल पथकासाठी प्रत्येकी एक लॅपटॉप  व  चार फोल्डिंग चेअर  वितरित करण्यात आल्या.

 

 

पीडितेला न्याय अन् गुन्हेगारास  कडक शिक्षा होईल असा तातडीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.