तिसर्‍या लाटेची भीती धूसर; आरोग्य खात्याचा दावा

बीड । वार्ताहर

राज्यामध्ये तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असून तज्ञांनी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये बालकांना धोका असल्याचेही सांगितले जात आहे. डेल्टा व्हेरियंट, डेल्टा प्लस याविषयी विषाणूचा संसर्ग होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.राज्यात डेल्टा व्हेरिएंट रुग्ण आता सापडत असले तरी बीडमध्ये दुसर्‍याला लाटेतच डेल्टा व्हॅनने शिरकाव केला होता. त्यामुळेच जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेमध्ये मृत्युदर कमालीने वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तिसरी लाट प्रभावी नसेल असा अंदाज आरोग्य खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

राज्यामध्ये डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा प्लस या दोन कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागला असल्याचे आरोग्य खात्यातील अधिकारी सांगत आहेत. राज्यामध्ये म्युकर मायकोसिसनंतर डेल्टाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात अशी परिस्थिती असली तरी जिल्ह्यात मात्र दुसर्‍याला त्यातच डेल्टाचा संसर्ग होऊन गेला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता कमी होवू लागला आहे. मात्र मृत्यूदर अजून कमी झालेला नाही. त्यातही शहरी भागातील रुग्ण नगण्य असून ग्रामीण भागामध्येच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिंयटच्या तपासणीसाठी 400 जणांचे नमुने पाठवण्यात आले होते, तर दुसर्‍या लाटेमध्ये 1600 पेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी गेले होते.दुसरी लाटच जिल्ह्यामध्ये प्रभावी राहिली.
पहिल्या लाटेत केवळ 18 हजार रुग्ण बाधित झाले होते, मात्र दुसर्‍या लाटेत 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बाधित झाले आहेत. एप्रिल,मे आणि जून हे तीन महिने दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. मे महिन्यामध्ये दिल्ली आणि पंजाब राज्यात डेल्टा व्हेरियंटचा रुग्ण सापडल्यानंतर इतर राज्यातूनही कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबमधूनच डेल्टाच्या तपासणीसाठी सँपल पाठवण्यात आले होते. यामध्ये मे महिन्यातील सँपल मोठ्या प्रमाणात गेले होते. त्याचेच अहवाल आता प्राप्त होत आहेत. याचाच अर्थ बीड जिल्ह्यामध्ये दुसर्‍या लाटेतच कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव होवून गेला. त्यामुळे आता तिसरी लाट फारशी प्रभावी राहणार नाही, असा अंदाज आरोग्य विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. असे असले तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार तिसर्‍या लाटेच्या दृष्टीनेही जिल्ह्यात तयारी केली जात असल्याचेही सांगण्यात आले.

साडेआठ लाख नागरिकांचे लसीकरण

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 लाख 74 हजार 552 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 6 लाख 61 हजार 212 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 2 लाख 13 हजार 313 नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. झालेल्या लसीकरणात कोव्हिशिल्डचे डोस सर्वाधिक आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे. कारण जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे.

ग्रामीण भागात लसीकरण वाढणे गरजेचे

शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्यात ग्रामीण भागात अद्यापही लस घेण्याकडे ग्रामस्थांचा कल दिसून येत नाही. यामध्ये आरोग्य खात्यातील अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करणे गरजेचे आहे, तरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आगामी काळात कमी होणार आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या 294 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातीलच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरण वाढणे महत्वाचे आहे.

कोविशिल्ड,कोव्हॅक्सीननंतर स्पुटनिकही उपलब्ध होणार

बीड जिल्ह्यात सुरुवातीपासून कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या लशीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तसेच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेता येतो. दरम्यान येत्या काही दिवसात जिल्ह्यात स्पुटनिक लसही उपलब्ध होणार आहे.

तिसर्‍या लाटेबाबत काळजी करू नये-राजेश टोपे

सप्टेंबर महिन्यात करोनाच्या तिसर्‍या लाटेचे भीषण रूप दिसू शकते, महिन्यात देशात दररोज 4 ते 5 लाख नवीन करोना रुग्ण वाढू शकतात, अशी भीती नीति आयोगाने व्यक्त केली आहे.आयोगाचा यासंदर्भात एक अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे. नीती आयोगाच्या ज्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ते जून महिन्यातील पत्र आहे. त्यात आताची कोणतीही माहिती नाही. निती आयोगाने जून महिन्यात तिसर्‍या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पॅनिक होऊ नये. राज्य सरकारची तिसर्‍या लाटेसाठी तयारी झालेली आहे.

 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.